Jaise Jyache Karma Taise Pahatechi Bhaktigeet Pranali Bagad on Harmonium Musical Creation
.
Lyrics in Marathi
.
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
क्षणिक सुखासाठी अपुल्या होत कुणी नितिभ्रष्ट
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
ज्ञानी असो की अज्ञानी तरी एक आहे जाण
मृत्युला ना चुकवी कोणी थोर असो अथवा सान
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण
अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
.
#Pahatechibhaktigeete, pranali bagad, pralhad shinde, jagi jivnache saar, jagi jivanache sar, ghyave kanuni satvar jaise jyache karma, taise, phal deto re ishvar, pralhad shinde songs, vitthalachi gani, पहाटेची भक्तीगीते, #विठ्ठलाचीगाणी, भजन,musical creation,
.
Thank you for watching
Like, Share and Subscribe
By:
MUSICAL CREATION.